Wednesday 7 December 2011

जगण्यासाठी फक्त कोकण हवा ...


नको तो AC नको तो Fan
मला वाडीतला गारवा हवा 

नको तो shower नको तो बाथ टब 
मोरीतल्या पाण्याचा थंडावा हवा 

नको तो बेड नको तो फोम 
खाटेवरचा मऊपणा  हवा 

नको तो burger नको ते snacks
प्यायला सोल-कढी खायला मोदकच हवा 

नको ती bislari नको  ते mineral water
खारट का असेना, पाण्याला  चवदारपणा  हवा 

नको त्या Tiles   नको ते रेड कार्पेट  
घरात गालीचा  सुद्धा  लाल  मातीचाच हवा 

नको ते Apple नको ते Orange
काटेरी असला तरी फलाहाराला फणसच हवा 

नको त्या Timelines नको त्या Deadlines
वेळ  सुद्धा  समुद्रासारखा  अमर्याद  हवा 

नको  ती  गर्दी  नको  ते  प्रदूषण 
नको ते  मुखवटे  नको  तो  भपकेपणा 


लाटांप्रमाणे एकामागे  एक  संकटे  झेलणारा,

दिवस  रात्र  दारिद्र्याशी  लढणारा, 

Mall, Multiplex, MNC चे तोंड  देखील  न  पाहिलेला,

रेतीला चटई  आणि  आभाळाला  पांघरूण  मानणारा, 

भरती ओहोटी च्या  काट्यांवर  चालणारा, 

समुद्याच्या लाटांच्या आवजालाच  Music मानणारा, 

‘अतिथी  देवो  भव:’ तत्व जगणारा, 

नैसर्गिक खजिन्याने  खिसा  भरणारा, 

आणि  सर्वात  महत्वाचे   म्हणजे , माणसातली  माणुसकी  जपणारा 

जगण्यासाठी  फक्त  कोकण  हवा  कोकण  हवा !! 


~ केदार