Wednesday 18 April 2012

पत्रास कारण की ....


अवधूत गुप्ते च्या "पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही " या गाण्याचे IT version.  
येथे पत्र म्हणजे Resignation letter.  

पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही.

पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही.
‘ऑनसाइट’ ची वाट बघण्या आता काही गंमत नाही.

माफ कर आई मला, नाही केल्या पाटल्या.
विमानातून फिरवण्याच्या बाता  हवेतच विरल्या. 
कस  सांगू मित्रांनो तुम्हा मी का refer करत नाही. 
या culture मध्ये  गड्या खरयालाच किंमत नाही. 

पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही.
‘Promotion’ ची वाट बघण्या आता काही गंमत नाही.

कर्जासाठी भटकून शिरपा गेला कंपनी सोडून.
पोरीपायी सोडली त्यानी असं लिवलं त्यांनी हटकुन.
गडी होता कामाचा पण Management ला किंमत नाही. 

पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही.
‘Appraisal’ ची  वाट बघण्या आता काही गंमत नाही.

या पगारात आता  आपले काही  होणे नाही.
बँक कर्ज देत नाही, बाप पोरगी देत नाही.
माफ करा गड्यांनो पण पुन्हा येथे आपली भेट नाही. 

पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही.
‘Mkt correction’ ची वाट बघण्या आता काही गंमत नाही.

दुसरीकडे असेल काही या आशेवर जगतो आहे.
या खेळामध्ये रोज तिळ तिळ मरतो आहे. 

माझ आणि कंपनीचे ओझे आता होईल कमी. 
जाता जाता कळले इथे Talent ला किंमत नाही. 

पत्रास कारण की, बोलायची हिंम्मत नाही.
'ऑनसाइट' ची वाट बघण्या आता काही गंमत नाही.

~ केदार

Thursday 8 March 2012

Team Player...






अतीव महत्वाच्या Lords test ला 11th hour ला संजय मांजरेकर आजारी पडलाय ?
OK मी  करतो  Lords वर  debut.

गांगुलीने debut 100 टाकल्याने माझी 95 ची inning overshadow झाली?
ठीक आहे, पुढच्या वेळी. 

Forward short leg ला उभे राहायला कोणी तयार नाही ?
मी थांबतो. 

First sleep मध्ये कोणी safe fielder नाही  ?
मी थांबतो 

Captain 1 टेस्ट साठी निलंबित झालाय ?
Ok मी  करतो captaincy .

Captain pitch वरचे Grass बघून toss च्या १० मिनिटे आधी आजारी पडलाय ?
Ok me karto captaincy 

Opener injured ?
मी करतो open.  

Opener एक match साठी ban ?
ठीक आहे मी करतो Open.

Opener डावाच्या पहिल्या ball ला बेजवाबदार फटका मारून बाद ?
Ok मी तयार आहे. 

No. 6 cha batsman 1st inning la चांगला खेळला म्हणून त्याला no 3 ला जायचय ?
Ok मी जातो no 6 ला.  

मी त्या Allen Donald ला Six मारली म्हणून तो शिव्या देतोय?
मी नाही देणार. After all its gentleman's game.

One day मध्ये  मी खूप हळू खेळतो म्हणून मला काढून टाकलत?
Ok I will try to improve my strike rate.

One day मध्ये ७ batsman खेळवायचे आहेत?
Ok मी करतो wicket keeping .. throughout World Cup.

२ दिवस खेळून सामना वाचवायचा आहे ?
Ok मी करीन.

ODI मध्ये slog overs मध्ये हाणामारी करायची आहे ?
Ok me karto.

2007 WC first round exit ची जवाबदारी कोण घेणार? 
ठीक आहे as a captain मी  घेतो.

2007 WC exit नंतर  लोकांनी माझ्या घरावर दगडफेक केली? कार फोडली  ?
ठीक आहे.

England मध्ये मी ३ शतक टाकली पण 4-0 हरलो. मिडियाला मी तोंड देऊ ?
Ok Will do that..

Australia मध्ये 'Bradman Oration ' ला  guest म्हणून  बोलायचे  आहे ?
हा तर माझा  सन्मान. बोलेन मी. 

Steve waugh च्या पुस्तकाला प्रस्तावना लिहायची  आहे ?
Its my pleasure.

हर्षा भोगले च्या  पुस्तकातला  शेवटचा लेख  'how to be a team player' विषयावर लिहायचा  आहे ?
Yes I will.

मी  १००००  केल्या  त्याच  दिवशी  विरूने  ३००  टाकल्या  त्यामुळे  १०००० ची  बातमी नाही झाली?
ठीक आहे. no worries.

मी १३००० केल्या त्याच दिवशी सचिन 23 short of 100th 100 !! त्यामुळे मी news मध्ये नाही?
ठीक आहे. no problem

Seniors ने retirement घ्यावी असं म्हणता ? 
Ok . Thank you everyone. येतो ........

Throughout his career he has lived with that curse, every time he has touched perfection somebody else surpassed it. SG @ Taunton , SRT @ Leeds , VVS @ Eden , Viru @ Lahor , Virat @ Cardif.

अजून ४० वर्षांनी, आमच्या नातवाची पिढी आम्हाला विचारेल "खरच क्रिकेट हा सभ्य गृहस्थाचा खेळ होता का हो ? "
आम्ही अभिमानाने सांगू "हो, एक माणूस होता राहुल द्रविड नावाचा. तो हा खेळ नि: स्वार्थी पणे खेळायचा ."

Thank you Rahul. Thank you so much.

~ केदार

Wednesday 7 December 2011

जगण्यासाठी फक्त कोकण हवा ...


नको तो AC नको तो Fan
मला वाडीतला गारवा हवा 

नको तो shower नको तो बाथ टब 
मोरीतल्या पाण्याचा थंडावा हवा 

नको तो बेड नको तो फोम 
खाटेवरचा मऊपणा  हवा 

नको तो burger नको ते snacks
प्यायला सोल-कढी खायला मोदकच हवा 

नको ती bislari नको  ते mineral water
खारट का असेना, पाण्याला  चवदारपणा  हवा 

नको त्या Tiles   नको ते रेड कार्पेट  
घरात गालीचा  सुद्धा  लाल  मातीचाच हवा 

नको ते Apple नको ते Orange
काटेरी असला तरी फलाहाराला फणसच हवा 

नको त्या Timelines नको त्या Deadlines
वेळ  सुद्धा  समुद्रासारखा  अमर्याद  हवा 

नको  ती  गर्दी  नको  ते  प्रदूषण 
नको ते  मुखवटे  नको  तो  भपकेपणा 


लाटांप्रमाणे एकामागे  एक  संकटे  झेलणारा,

दिवस  रात्र  दारिद्र्याशी  लढणारा, 

Mall, Multiplex, MNC चे तोंड  देखील  न  पाहिलेला,

रेतीला चटई  आणि  आभाळाला  पांघरूण  मानणारा, 

भरती ओहोटी च्या  काट्यांवर  चालणारा, 

समुद्याच्या लाटांच्या आवजालाच  Music मानणारा, 

‘अतिथी  देवो  भव:’ तत्व जगणारा, 

नैसर्गिक खजिन्याने  खिसा  भरणारा, 

आणि  सर्वात  महत्वाचे   म्हणजे , माणसातली  माणुसकी  जपणारा 

जगण्यासाठी  फक्त  कोकण  हवा  कोकण  हवा !! 


~ केदार




Monday 7 November 2011

दैवत









काही काही नावं अशी असतात जी आपण पहिल्यांदा कधी ऐकली ते सांगू शकत नाही. आई वडिलांची आणि आपली ओळख कोणी करून देत नाही. लता दीदींचा आवाज पहिल्यांदा कधी ऐकला ते सांगता येत नाही. तसेच पुरुषोत्तम लक्ष्मण  देशपांडे हे नाव पहिल्यांदा कानावर कधी पडले ते आठवत नाही पण जेंव्हा कानावर पडले तेंव्हा हसू नक्की आले असणार. 

आम्हाला शाळेत  असताना पुलंचे काही धडे अभ्यासाला होते.  अंतू बर्वा, उपास या धड्यांमुळे पुलंची ओळख होत होती. त्या व्यतिरिक्त घरात पुलंच्या बऱ्याच कॅसेट होत्या. त्यात चितळे मास्तर, म्हैस, पोस्ट ऑफिस, माझे शत्रुपक्ष अश्या अनेक गोष्टी पहिल्यांदा ऐकल्या आणि तेंव्हा पासून पुलंनी मनात घर केले होते, मनमुराद हसवत होते. तेंव्हा शाळेतील धडे सोडून ज्या काही पुलंच्या थोड्याफार गोष्टी ऐकलेल्या होत्या त्याचा मराठीच्या पेपरला खूप फायदा व्हायचा. मी पत्र लिहिताना त्या उपमा बेमालूमपणे वापरायचो. आठवीत असताना 'माझा आवडता खेळाडू' निबंध लिहिताना त्याचा शेवट 'तो जर मला भेटलाच तर मी एकच वाक्य म्हणेन  - कोण तुजसम सांग मज गुरुराया' असा केलेला आठवतो. हा पुलंची पुस्तके वाचण्याचा परिणाम होता.

तर अशा रीतीने शाळेतल्या २-३ धड्यातून आणि घरच्या कॅसेट मधून पुलंनी वेड लावले होते. 
त्यांची बाकीची पुस्तके खुणावत होती. याच वेडापायी मी नववीच्या उन्हाळाच्या सुट्टीत पुणे मराठी ग्रंथालयात जायला लागलो आणि पुस्तके वाचण्याचा सपाटा लावला. त्या सुट्टीमध्ये, ते ग्रंथालय उघडणारा शिपाई आणि रात्री दिवे बंद करून कुलूप लावणारा शिपाई यांना मी सोबत केल्याचे आठवतय. 

खोगीरभरती,  बटाट्याची चाळ, असा मी असामी,  ह(फ)सवणूक , गणगोत, व्यक्ती आणि वल्ली,  नस्ती उठाठेव, अपूर्वाई, उरलासुरला अशी अनेक पुस्तके त्या सुट्टीत वाचली आणि या लेखकाच्या प्रेमात पडलो. माझ्या घरापासून एक किलोमीटर  अंतरावर राहत असलेल्या या माणसाला भेटावे, पाया पडावे असे वाटू लागले आणि तीच  उन्हाळ्याची सुट्टी संपत असताना म्हणजे १२ जून २००० या दिवशी या माणसाचे मी पहिले दर्शन घेतले ते त्यांच्या अंतयात्रेत. पहिले आणि शेवटचे दर्शन !

त्या दिवसापासून रोज हा माणूस माझ्या बरोबर असतो. 

आई वडिलांनंतर जर कोणी माझ्यावर संस्कार केले असतील तर ते या माणसाने !!

३ वर्ष मुंबईत राहताना, पुण्यातून दर सोमवारी निघताना  पुलंचे पुस्तक बरोबर न्यायला  कधीच विसरलो नाही.
रात्री रूमवर घरच्यांची आठवण आल्यावर व्यक्ती आणि वल्ली मधले  'ते चौकोनी कुटुंब'  किंवा गणगोत मधले 'बाय' , 'ऋग्वेदी' , 'आप्पा' हे लेख का वाचले याला उत्तर नाही. 
आपल्याला आवडलेल्या एखाद्या मुलीचे लग्न ठरल्याची बातमी ऐकल्यावर त्या रात्री  'नंदा प्रधान' १० वेळा का वाचले याला उत्तर नाही.
अंतू बर्वा, बबडू, रावसाहेब , हरितात्या, नारायण, लखू रिसबूड, बापू काणे , बोलट, भय्या नागपूरकर या आणि अशा अनेक पात्रांनी काय शिकवले ते शब्दात सांगता येणार  नाही . 

अपूर्वाई वाचताना मी पण पहिल्यांदा विमान प्रवासाला निघालो तर माझी पण अशीच तारांबळ उडेल,पहिल्यांदा कोट घालताना अशीच  धांदल उडेल असे वाटत राहते.  असे वाटणे , पुलंमध्ये प्रत्येक मराठी माणसाने स्वतःला पाहणे हेच त्यांचे सर्वात मोठे यश आहे. 

'पुणेकर मुंबईकर नागपूरकर' मध्ये पुलंची दृष्टी कळून येते. लहान लहान गोष्टींचे निरीक्षण अफलातून. पुलंनी डोळे उघडे ठेऊन फिरायला शिकवले. 

'एक शून्य मी' वाचल्यापासून माझी एकही दिवाळी अशी गेली नाही कि ती "आमच्याकडे धाच पैसे आहेत " म्हणणारी मुलगी आठवली नाही.

प्रत्येक गोष्टीचा शेवट करण्याची पुलंची एक खास पद्धत. अंतर्मुख करायला लावणार, हसता हसता रडवणार. 
'गणगोत' मधल्या प्रत्येक व्यक्तिचित्राचा शेवट असो किंवा 'व्यक्ती आणि वल्ली' मधल्या काल्पनिक व्यक्तिचित्रांचा शेवट असो,
'असा मी असा मी' मधले ते शेवटचे घड्याळाचे वाक्य असो किंवा 'बटाट्याची चाळ' मधला  शेवटचा सीन असो,
शेवट कायम विचार करायला लावणारा आणि त्यामुळेच लेखनाची छाप मनावर कायमचा उमटवणारा.

केवळ लेखक म्हणून नाही तर माणूस म्हणून पु ल किती मोठे होते ते त्यांच्यावर इतरांनी लिहिलेल्या पुस्तकातून कळते. 
त्यांचे समाजकार्य थक्क करणारे आणि महत्वाचे म्हणजे या कानाचे त्या कानाला कळू न देता केलेले समाजकार्य.
या समाजाचे आपण फार मोठे देणे लागतोय हे पुलंनी शिकवले.
आपल्याकडे जे जे आहे ते ते सर्व दुसऱ्यांना द्यावे. To give is the fastest way to gain  हे पुलंनी शिकवले मग ते पैसा असो वा पुस्तके हात आखडता घेणे नाही. 
जे जे चांगले ऐकले, पाहिले किंवा वाचले आहे ते ते इतरांना  सांगून त्यांच्या पण आयुष्यात बहार आणली पाहिजे. माणसाला दु:खी कष्टी करणाऱ्या गोष्टी हल्ली पावला-पावलावर घडतात. रडवणारे खूप आहेत हसवणारे थोडे म्हणून आपण दुसऱ्यांच्या रुक्ष चाकोरीबद्ध जीवनात जर क्षणभरासाठी जरी धमाल उडवू शकलो, आनंदयात्रा बनवू शकलो, तरी ते पुण्याचे काम हि शिकवण  पुलंचीच

कधी कधी मी विचार करतो कि आपण लोक आपल्या पुढच्या पिढीला काय देऊन जाणार ? काय शिकणार पुढची पिढी आपल्याकडून ?  अशी कुठली गोष्ट आहे का कि जी आपण मागे ठेऊन जाऊ शकतो ज्यामुळे पुढच्या पिढीला मदत होईल ? त्यांच्यावर संस्कार होतील ? आयुष्याच्या प्रत्येक क्षणी त्यांना साथ देईल अशी काही वस्तू आपण पुढच्या पिढीला देऊ शकतो का ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मला मिळतात जेंव्हा मी घरातल्या पुस्तकांच्या कपाटाकडे बघतो.
पुलंची पुस्तके ... खऱ्या अर्थाने संस्कारांची शिदोरी ..ज्यांनी वाचली त्यांना माझे म्हणणे पटेल 

ipod, laptop, mp3, VCD, DVD मुळे तर हि शिदोरी कायम जवळ बाळगता येते आणि आमच्या corporate life मध्ये त्याची सतत गरज पडते.

तासनतास  मीटिंग  मध्ये  बसून  डोके  खराब  होते. तीच  ती  फालतू  बोल  बच्चन ऐकून  बोर होते. तेच  ते  sugar coated words ऐकून  कान  कीटतात. त्या  timelines .. ते  billability .. ते schedule डोक्यात  जाते. पोटासाठी  काय  काय  करावे  लागतंय  असा  विचार  मनात  चमकून  जातो. या  IT जगाचाच  तिटकारा  वाटू  लागतो. अश्या  मीटिंग  संपवून  मी  कसा  बसा डेस्क  वर  येतो  .. pc unlock करतो. headphone कानाला  लावतो  आणि  desktop वरच्या  एका  folder वर  double click करतो  ... पहिलीच  file, A ने  चालू  होणारी,  open  करतो  ... 

कानात  "रत्नागिरीच्या  त्या  मधल्या  आळित  लोकोत्तर   पुरुष  राहतात " अशी  ओळ  ऐकू  येते  आणि  पुढची  30 मिनिट  हा  माणूस  माझा  ताबा  घेतो  .. 

सर्व दु:ख विसरली जातात .. क्षीण क्षणात नाहीसा होतो .. हा  माणूस  आपल्याला  सोडून  गेलेला  नाही  .. जाऊच शकत नाही ... खूप उपकार आहेत या माणसाचे आपल्यावर ..

पु.ल. तुम्ही अजरामर झालात. 

पु. ल. जन्मदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

 ~ केदार

Thursday 3 November 2011

मित्र


नवीन   कंपनी  मधला  पहिला  दिवस  म्हणजे  जरा  वेगळेच  दडपण  असते . भले  ती  तुमची  पहिली  कंपनी  असो  वा  तिसरी . पण  मला  मात्र  या  नवीन  कंपनी  मधल्या  पहिल्या  दिवसाचे  कायमच  अप्रूप   वाटत आलंय.

नवीन  location , नवीन  लोक  , नवीन  culture , नवीन  काम  (?) आणि  सर्वात  महत्वाचे  म्हणजे  नवीन  मित्र  मैत्रिणी  (हो  .. जरा  जास्तच  extrovert असल्याने  नवीन  ठिकाणी  मी  खूप  मित्र  जमवायचा  प्रयत्न  करतो  … निवड  चुकल्याने  बऱ्याचदा  तोंडावर  पडतो  तो  भाग  वेगळा  !!)

तर  असाच  विचार  करत  मी  या  वर्षी  tieto कंपनी  जॉईन  केली . Joining   च्या  दिवशी  20-22 लोकांमध्ये  बसलो  होतो  आणि  as usual टेहळणी  चालू  झाली  होती . काही  प्रेक्षणीय  स्थळ  माझ्याबरोबर  जॉईन  झाली  आहेत  का  ते  बघत  होतो  पण  तिसऱ्या  कंपनी  मध्ये   पण  घोर  निराशाच  झाली  !! (फार  काही  अपेक्षा  नव्हत्या  हो  मझ्या  …पण  ते  जाऊदे  )

पहिल्या दिवशी  लोकांशी  तोंड   ओळख  झाली  आणि  एक  दोन  मुलांशी  जुजबी  बोलणे  पण  झाले . तेंव्हा  त्याच  २०  लोकांच्यात  बसलेला  'हा'  मुलगा  अजिबात  दिसला  नाही  .. तो  गर्दीत  उठून  दिसणारा  नाहीच  मुली . एकदम  साधा  राहणारा  . सिम्पल   फॉर्मल  कपडे  घालून  , चष्मा  लावून  बहुतेक  लास्ट  रो   मध्ये  बसला  असावा . पहिले  ३  दिवस  आम्ही  २०  लोक  एकाच  conference रूम  मध्ये  होतो  पण  या  मुलाचे  अस्तित्व  सुद्धा  जाणवले  नाही  .

३  दिवसानंतर  सगळ्यांना  डेस्क  allocate   झाली  आणि  मी  माझ्या  डेस्क  वर  येऊन  बसलो  . दुसऱ्या  दिवशी  या  मुलाचा  मला  communicator   वर  पिंग  आला  . मी  नाव  वाचले  पण  कोण  हा  मुलगा  ते  माहित  नसल्याने  दुर्लक्ष  केले . त्याने  परत  पिंग  केले  . joining   ला  ज्या  काही  formalities complete करायच्या  असतात  त्यातले  त्याला  काही  तरी  अडले  होते  . तो  माझ्या  डेस्क  वर  आला  . मी  त्याला  हवी  असलेली  माहिती  दिली  आणि  उपजत  आगाऊपणे   त्याच्याकडे  एक  “काय  पण   कटकट  आहे  राव  ..” असा  कटाक्ष  टाकला  .. त्याने  उपजत  समजुतदारपणे  दुर्लक्ष  केले  आणि  हवी  ती  माहिती  घेऊन  निघून  गेला . थोड्या  दिवसांनी  त्याने  आणि  मी  एकच   बस  जॉईन   केली . बस  मध्ये  समोरासमोर  आल्यावर  एखाद  दोन  शब्द  बोललो  असू . काही   दिवसांनतर  एकदा  ४    वाजता  त्याचा  मला  पिंग  आला  कि  चहा  ला  येणार  का  ? नुकतीच  झोप  झाली  असल्याने  मला  पण  चहाची  गरज  होतीच  म्हणून  मी  हो  म्हणालो  आणि  मग  रोजच  आम्ही  दोघ  ४  वाजता  चहा  ला   बरोबर  जायला  लागलो . पहिल्या   ३ -४   दिवसातच  मी  ओळखले  कि  हा  तर  माझ्या  exactly opposite मुलगा  आहे  .

हा  मुलगा  समोरून  एखादी  सुंदर  मुलगी  गेली  तर  बघत  पण  नाही  (किंवा   बघून  न   बघितल्यासारखे   करतो ) हा  खूपच  कमी  बोलतो  आणि  आपले  काम  बरे  आणि  आपण  बरे  अश्या  विचारांचा  आहे . हा  बिलकुल  कोणावर  sarcastic comment   मारत  नाही .

हा  क्रिकेट खेळाडूंबद्दल  बोलताना  शिव्या  देऊन  बोलत  नाही  . in fact हा  कधी  शिवीच  देत  नाही  (मला  एकदा  तरी  याला  करकचून  शिव्या  देताना  ऐकायचे  आहे  . मला  खात्री  आहे  कि  याने  शिवी  दिली  तरी  ओवी  म्हटल्यासारखे   वाटेल  . नाही  तर  मी , ओवी  म्हणालो  तरी  समोरच्याला  शिवी  दिल्याचा  भास  होतो !! )

ह्याने  कधीच  कोणाचा  मार  खाल्ला  नसेल . शाळा  किंवा  कॉलेज  मधून  पळून  गेला  नसेल . रात्री  १२  वाजता  रस्त्यावर  धिंगाणा  घालून  वाढदिवस  celebrate केले  नसतील   . नुसते  dinner साठी  लोणावळ्याला  जायचा  मूर्ख  पण  केला  नसेल . कधीच  कोणाशी  भांडला  नसेल .

थोडक्यात  काय  तर  हा  अगदी  साधा  सरळमार्गी  सज्जन  मुलगा  आहे  हे  मी  ३ -४   दिवसात  ओळखले . (याने  संपूर्ण  शैक्षणिक  कारकिर्दीत  जेवढी  कॉपी  केली  नसेल  तेवढी  कॉपी  तर  मी  लहानपणीच   गणिताच्या  पेपरला   केली  असेल !! )  अश्या  या   २  संपूर्ण  भिन्न  प्रवृत्तीच्या  लोकांना  एकत्र  आणून  देवाने  काय  साधले  काय  माहित  असे  मला  वाटायला  लागले . पण  तरी  रोज  ४  चा  चहा  त्याच्या  बरोबर  चालू  ठेवला  आणि  तो  बंद  केला  असता  तर  आज  किती  चांगला  मित्र  गमावला  असता  याचा  विचार  न  केलेलाच  बरा .

हळू  हळू  आमच्या  गप्पांचे  विषय  बदलू  लागले  आणि  अचानक  काही  साक्षात्कार  झाले  ते  असे  –

मराठी  साहित्यात  पु . ल  , क्रिकेट  मध्ये  सचिन  , द्रविड  , commentators मध्ये   हर्षा  , राजकारणात  राज  , picture मध्ये   नाना  पाटेकर  अशी  आमची  त्या  त्या  क्षेत्रातली  दैवत  match   होत  होती . क्रिकेट , संगीत  , राजकारण  , नाटक  , सिनेमा  या   गोष्टींवर  चर्चा  रंगू  लागल्या  आणि  मग  ४  वाजता  चहा  साठी  त्याचा  पिंग  यायच्या  आधी  मी  त्याला  पिंग  करू  लागलो .

पु  ल  आणि  एकूणच  मराठी  साहित्याविषयी  याचे  प्रेम  अफाट . त्याने  ग्रेस  ,  पाडगावकर   यांच्या  वर  बोलायला  सुरवात  केल्यावर  मला  गप  बसणे  भाग  होते . मग  मी  माझे  हुकमी  शस्त्र  काढले  . शिरीष  कणेकर  . मला  भेटायच्या  आधी  त्याने  कणेकर  कितपत  वाचले  होते  माहित  नाही  पण  लगेचच  त्याने  कणेकरांची  खूप  पुस्तके  वाचली  आणि  त्यांना  मेल  करून  अभिप्राय  कळविण्या  इतपत  त्यांचा  fan   झाला .

त्याच्याकडे  असलेल्या  पुस्तकांची  संख्या  ४००  पेक्षा  जास्त  आहे  हे  जेंव्हा  मला  कळले  तेंव्हा  react कसे  करावे  ते  कळेना  . मी  कुठल्याही  पुस्तकाचे  नाव  काढले  कि  त्याने  ते  वाचलेले  असायचे  !!

शेवटी  द्वारकानाथ  संझगिरी  ची  काही  पुस्तके , 'आहे corporate तरी... '  आणि  सुहास  शिरवळकरांचे   दुनियादारी  त्याने  वाचले  नव्हते  त्यामुळे  मी  त्याच्या  वर  १  point स्कोर  करू  शकलो   :)

पुढच्या  १०  दिवसात  त्याने  ती  पण  पुस्तके  वाचली  आणि  मी  score केलेला  एक  point पण  हिरावून  घेतला  :)

मराठी  साहित्याची  हि  गत  तर  क्रिकेटची  वेगळीच  गत . तिथे  दोघांचे  हि  देव  सेम   होते   आणि  क्रिकेट  इतिहासाचे  वेड  पण !!
याला  टेनिस   किंवा  Football काय  माहित  नसेल  या  अविर्भावात  मी  टेनिस   आणि  football विषयी  बोलायला  लागलो  पण  टेनिस  मध्ये  ह्याचा  आवडता  खेळाडू  नदाल  आणि  माझा  फेडरर !!

Football मध्ये  याची  team Man U आणि  माझी  arsenal असल्याने  बोलणे  तिथेच  खुंटले  . एरवी  मी  नदाल  fans किंवा  Man u fans शी  तावातावाने  भांडलो  असतो  पण  याच्याशी  भांडता  येत  नाही  कारण  हा  मला  चीथवणारा response देणार  नाही  :)


एकदा  या  मुलाने  बस  मध्ये  पेढे  वाटले  . कारण  काय  तर  याने  कॅमेरा  घेतला  होता . तो  कॅमेरा  ३२०००  चा  आहे  कळल्यावर   मी  shock   झालो  . इतका  महागाचा  कॅमेरा  असतो  हे  पण  मला  माहित  नव्हते  . हळू  हळू  त्याचे  photography skill पाहिले   आणि  मी  काढतो  त्या  फोटोंना  फोटो  म्हणायची  मला  लाज  वाटू  लागली . केवळ  photography   साठी  आम्ही  ४  मित्र  एकदा  कोकणात  गेलो . Photography skill तर  अफलातून  आहेच  पण  याचे  कोकण  प्रेम  पाहून  मी  थक्क  झालो . Trip   वरून  आल्यावर   याने  लिहिलेले  कोकणावरचे लेख  मस्त  होते  . (त्या   ट्रीप  मध्ये  मी  फोन   करून  एका  माणसाकडे  आमच्या  जेवणाची  सोय  केली  होती  पण  काही  प्रोब्लेम  मुले  ते  बुकिंग  cancel झाले  तेंव्हा  “अरे  कोकणात  कोणाचेही  दार  ठोठवा   जेवण  नक्की  मिळणार  ” असा  त्याने   धीर  दिला  होता  !!)

कुठलेही  २  मित्र  एकत्र  भेटल्यावर  जो  विषय  चर्चिला  जातोच  जातो  तो  विषय  म्हणजे  लग्न . त्या  बाबतीत   त्याची  मत   एकदम   स्पष्ट   आहेत  आणि  एकदम  perfect . तेंव्हापासून  एखादी  चांगली  मुलगी   दिसली  कि  तिची  पत्रिका  आम्ही  दोघ  मांडायला  लागलो  :)

हळूहळू  आमच्या  गप्पांना  ४  चा  चहा  चा  वेळ  कमी  पडू  लागला  आणि  ऑफिस  communicator वर  chatting ला  ऑफिस  चा  वेळ कमी   पडू  लागला  म्हणून  घरी  गेल्यवर  sms वर  बोलायला  लागलो . ब्रिटीश  library मध्ये  एखादी  सुंदर  मुलगी  पाहिल्यावर  किंवा   घराजवळ  एखादी  सुंदर  मुलगी  पाहिल्यावर  त्याचे  येणारे  sms वाचून  खूप  हसू  यायचे  :)

त्याच्या  मित्रांचे  हनीमून  चे  किस्से  सांगून  पण  त्याने  मला  खूप  हसवलंय  :)

एका  सामाजिक संस्थेच्या 'annual day ' ला  मी  याला  बोलावले . काहीही  कुरकुर  न  करता  हा  रविवारी  सकाळी  आला  होता  आणि  शांतपणे  सगळा  कार्यक्रम  एकट्याने  पहिला . कार्यक्रमानंतर  माझे  अभिनंदन  केले  आणि  पुढच्या  रविवार  पासून  न  चुकता   social work करायला  माझ्याबरोबर येऊ  लागला .

हा  चांगल्याला   चांगले  म्हणतो  आणि  चुकत  असेल  तर  लगेच  सांगतो  .

ऑफिस मध्ये  आम्ही  एक  activity  केली   होती  तेंव्हा  त्याला  यायला  जमणार  नव्हते  . अशा  वेळी  “तु भीड  रे  .. फुल  नड .. आपला support आहे  ”  असे  तोच  सांगतो  आणि  माझे  जर  काही  चुकत  असेल  (जे  बऱ्याचदा  होते ) तर   “नको  लोड   घेऊ  .. काही  फायदा  नाही  याचा  …सोडून  दे  ” हे  पण  तोच  सांगतो
एखादे पुस्तक किंवा माझे लिखाण जर मी अयोग्य माणसाला वाचायला देत असेल तर "भाई , दान सत्पात्री असावे .. उगाच कोणाला पण वाचायला नको  देऊ " असे त्यानेच सांगितले होते

कुठल्याही  नाटकाचे  टीकिट   काढताना  मी  त्याला  "येतो  का ?"  विचारल्यावर  त्याने  नाही  कधीच  म्हटले  नाही . नाटकाला  आमच्या  बरोबर  माझे  'अवलादी'  मित्र  किंवा कधी कधी   माझ्या  मित्रांचे  आई  बाबा  पण असायचे तरी  याला   बोर  कधीच  झाले  नाही . 

एकदा  सहज  म्हणून  आम्ही  ३ -४  मित्र  रानडे  institute च्या  कॅन्टीन  मध्ये  जमलो  होतो  . गप्पा  आणि  चहा  साठी . त्या  एका  मामुली  जागेवर  आम्ही  जमवलेल्या  कट्ट्यावर  याने  लिहिलेला  लेख  केवळ  अप्रतिम . तसाच  भरत  नाट्य  मंदिर  वर  लिहिलेला  लेख  .. एखाद्या  साध्यातल्या  साध्या  गोष्टीकडे  /  घटनेकडे  बघण्याचा  याचा  दृष्टीकोन  खूप  आवडला  ..

लहान  लहान   गोष्टींचे    हटकून  कौतुक  करण्याची  याची  सवय  फार  चांगलीये . मग  ती  गोष्ट  काहीही  असो . मी  लिहिलेले  लेख  , मी  वाचायला  दिलेली  पुस्तके  यावर  अभिप्राय  कळवणारच  . एवढेच   काय  माझ्या  घरी  पहिल्यांदा  येऊन  गेल्यावर  “तुझ्या  घरी  आल्यावर   कसे  अगदी  'घरी' आल्यासारखे  वाटते . आता  मला  पुण्यात  अजून  एक  हक्काचे  घर  मिळाले  जिथे  जाऊन  मी  कधीही  दार  ठोठवू शकतो  आणि  सांगू  शकतो  कि  मी  आलोय !!” असा  त्याने  केलेला  sms चांगला  लक्ष्यात  राहिलाय !

हळू  हळू  स्वतःचे  एक  एक  रंग   दाखवणाऱ्या  या  मित्राने  कविता  आणि  गझल  सुद्धा  लिहून  दाखवली  !!
मी  त्याच्या  कडून  खूप  शिकलो  आणि  खूप  शिकायचे  बाकी  आहे . माझ्याकडून  त्याला  काहीच  शिकण्यासारखे  नसल्याने  तो  माझ्या  बोलण्यात  हमखास  येणारे  चित्र  विचित्र  शब्द  शिकला  (भाई  , लोड  , दुकान  उघडले  , byeeee reeee) आणि  त्याचा  प्रयोग  माझ्यावरच  करू  लागला  :)

७  महिन्यांपूर्वी   या  मुलाशी  बोलण्यासाठी  मला  कारण  शोधावे  लागले  होते 
आता  पुढचे  ७  जन्म  याच्याशी  काही  बोलायचे  नसेल  तरच  कारण  शोधावे  लागेल !!
हि  तर  फक्त  सुरवात  आहे  . अजून  आम्हाला  बरच  काही  करायचे  आहे .
आमच्या  दोघांचेही  'martial status' बदलल्या  नंतरही  ,  पेपर   मधला  एखादा  चांगला  लेख  वाचल्यावर  / TV वर  एखादी  चांगली  match चालू  असेल  तर  / काहीतरी  चांगले  वाचण्यात  आले  तर  एकमेकांना  ते  सांगण्यासाठी  त्वरित  sms येतच  राहतील  याची   मला  खात्री  आहे .

पु ल  म्हणालेत  तेच  खरय  "एखाद्या माणसाची आणि आपली वेव्हलेंग्थ का जमावी आणि एखाद्याची का जमू नये, ह्याला काही उत्तर नाही. पंधरा-पंधरा, वीस-वीस वर्षांच्या परिचयाची माणसे असतात. पण शिष्टाचारांची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्याचा आपला संबंध जातच नाही. आणि काही माणसे क्षणभरात जन्मजन्मांतरी नाते असल्यासारखी दुवा साधून जातात. वागण्यातला बेतशुद्धपणा क्षणार्धात नष्ट होतो. तिथे स्थलभिन्नत्व आड येत नाही. पूर्वसंस्कार, भाषा, चवी, आवडीनिवडी, कशाचाही आधार लागत नाही. सूत जमून जाते. गाठी पक्क्या बसतात. "
मित्रा , तुला thanks म्हणून मी आपल्या मैत्रीचा अवमान करू इच्छित नाही ..


PS –
 हा  लेख  वाचल्यानंतर   ५  मिनटात  मला  त्याचा   sms येईल  आणि  तो  कसा  असेल  याची  मला  खात्री  आहे  . तो म्हणेल   “अहो  भाई  …. वेडेत  का तुम्ही ?  आज  काय  वेगळच  दुकान  उघडलंय   तुम्ही  !! काय  लोड   आहे  ? ?  हे  असा  काहीतरी  तुम्ही  लिहिता  आणि  आमच्या  डोळ्यात  पाणी  आणता    बघा  … भाई  तुम्ही  आमच्यावर  लिहिणे  म्हणजे  सूर्या  ने  समई  च्या  तेजावर  लिहिण्यासारखे  आहे  ..असा  नसतं  भाई  .. आणि  आपल्या  मैत्रीविषयी  म्हणाल  तर  बायका  जश्या   वडाच्या  झाडाला  फेरे  घालून  हाच  पती  ७  जन्म  मिळो  म्हणत  असतात  तशी  पद्धत  जर  पुरुषांच्यात   असती  तर  मी  पण  ७  जन्म   हाच  मित्र  मिळो  असे  म्हणालो  असतो  … भाई  तुमच्या  लाडक्या  SK च्या पोटाची  शप्पथ  .. आपली  मैत्री   तुटायची  नाय  :) ”

~ केदार

Wednesday 19 October 2011

एकदा स्वतःवरच प्रेम करून पाहीन म्हणतो...




खूप पाहिली मित्रांची कमावलेली शरीरं आणि मैत्रिणींची गमावलेली वजनं
आता मात्र,
डोक्यावरच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत झिजलेल्या स्वतःकडे एकदा लक्ष देईन  म्हणतो...

खूप हसवलं दुसऱ्यांना  तीसऱ्यांना  आणि सर्वांना
काही मला हसले तर काही माझ्या विनोदांना
रोज रात्री मनमुराद रडत झोपणाऱ्या स्वतःलाच एकदा हसवून बघीन  म्हणतो...

खूप वाचली पुस्तकं, लेख आणि कथा
कधीच गोंजारले नाहीत स्वतःचे रोग आणि व्यथा
आता पुस्तक वाचण्यापेक्षा,
स्वतःच्याच कपाळावरच्या आणि हातावरच्या रेघोट्या वाचीन  म्हणतो...

खूप  केले लोकांना inspire
कधी थोरा मोठ्यांच्या गोष्टी सांगून
तर  कधी मित्रांचीच उदाहरण देऊन
आता जरा स्वत्व हरवलेल्या स्वतःलाच नवसंजीवनी देईन  म्हणतो...

खूप फिरलो टेकड्यांवर नदीकाठी आणि पुलावर
वेड्यासारखा बोललो आणि हसलो त्या कट्ट्यांवर
आता त्याच सगळ्या जागांवर,
वेड्यासारखा स्वतःशीच मोठ्याने बोलीन  म्हणतो...

खूप पहिले खेळ, काही खेळून तर काही नुसतेच
नियतीने मांडलेल्या खेळाकडे केवळ प्रेक्षक म्हणून न बघता,
एक खेळाडू म्हणून त्यात भाग घेईन  म्हणतो...

खूप वाजवल्या टाळ्या, दुसऱ्यांच्या तिसऱ्यांच्या आणि सर्वांच्याच यशात
एकदा स्वतःलाच ताळ्यावर आणायला,
एका हाताने टाळी  गालावर वाजवीन  म्हणतो...

तीच गाडी तोच driver पण कोणालाच बरोबर न घेता
त्याच रस्त्याने परत एकदा कोकणात जाईल म्हणतो
समुद्राची पातळी वाढेस्तोवर रडून मोकळा होईन  म्हणतो...

दुसऱ्यांनी सतत काढलेले माझ्यातले दोष
खरंच आहेत का माझ्यात ते एकदा शोधीन म्हणतो...
आणि आरशासमोर उभा राहून,
कोणालाच न दिसलेला,
एक तरी गुण स्वतःत आहे का तेही एकदा शोधीन म्हणतो...

खूप  झाल राजकारण
जरा जास्तच  झाल समाजकारण
रक्ताच्या नात्यांशिवाय,
स्वतःशीच स्वतःच्या असलेल्या नात्याला जगण्याचे कारण बनवेल म्हणतो...

खूप विकला चांगुलपणा आणि खूप दाखवले औदार्य
खूपदा केले माफ आणि खूप दाखवली दया
बराचसा घालवल्यावर एकदा,
स्वतःवरच थोडासा पैसा आणि थोडा जास्तच वेळ खर्ची करीन  म्हणतो...

खूप शिकलो लोकांकडून आणि थोडा प्रयत्नही  केला शिकवायचा
खर तर  काडीचीही  किंमत  नसलेले, पण जगाच्या लेखी सर्वस्व असलेले
ते पुस्तकी  शिक्षण  एकदाचे  संपवून  टाकीन   म्हणतो...

खूप पाहिले अशिक्षित आणि खूप पाहिले उच्चशिक्षित
स्वतःला मात्र  सुशिक्षित बनवण्याचा ,
एक प्रयत्न करावा म्हणतो...


दुनियेची रीत कधीच नाही कळली 
आनंद दाखवू नये लोक दु:खी होतात
दु:ख दाखवु नये लोक आनंदी होतात
आता मात्र,
नफ्या तोट्याची गणित सोडवता नाही आली तरी चालतील
पण  नीट उतरवून तरी घेईन  म्हणतो...


स्वतःवरच करणार असल्याने नकाराची भीती नाही
स्वतःवरच करणार असल्याने होकाराचा फायदा नाही
तरी पण,
बाकीच्यांवर करून असेलच उरलेले थोडेसे तर
एकदा स्वतःवरच प्रेम करून पाहीन  म्हणतो...


 ~ केदार

Monday 5 September 2011

जाऊदे .. लोक काय म्हणतील !!



( लहान असताना ७ वारांची कहाणी ऐकली होती तशी , मध्यमवर्गीय मराठी माणसा हि तुझी कहाणी तुलाच अर्पण )

**         वय  वर्षे  २ 
कोणीतरी  पाहुणे  आले  आहेत . कोणी  तरी  माझ्या  साठी  बनवलेला  स्वेटर  आणला आहे  . त्या  पाहुण्यांना  तो  दाखवण्यासाठी  मला  घातलाय  तो  स्वेटर . प्रचंड  गरम  होतंय  पण  केवळ  कोणाचे  तरी  शिवणकाम  दाखवण्यासाठी  मला  तो घालावा लागतोय  . मी  सांगू  का  कि  काढा  तो  स्वेटर ? पण  कसे  सांगू  मला  तर  बोलता  येत  नाही  . रडू  का  ? पण  जाऊदे  लोक  काय  म्हणतील  …

**         वय  वर्षे  ८ 
आई  बाबांनी  तबल्याच्या  क्लासला  घातलाय  . क्लास  शाळा  सुटल्यावर   लगेच  असतो  . वर्गातील  बाकीची  मुले  शाळा  सुटल्यावर  क्रिकेट  खेळतात  . मला  पण  त्यांच्या  बरोबर  क्रिकेट   खेळायचे  असते  पण  क्लास  असतो  . मला  तबला  नाही   शिकायचा  मला  क्रिकेट  खेळायचे  आहे . घरी  सांगू  का  ?  नको  जाऊदे  . त्यांनी  वर्षाची  फी  भरलीये  . त्यांची  इच्छा  आहे  घरात  कोणाला  तरी   तबला वाजवता यावा  ..जाऊदे  जात   राहतो  क्लासला  .. आई  बाबा  काय  म्हणतील !!

**         वय  वर्षे  १० 
आज  तबल्याच्या  क्लासची  परीक्षा  .. मी  ताल  वाजवून  दाखवले  .. सगळे  बरोबर  .. मला certificate. घरचे  खुश  . पुढच्या  महिन्यात  next  level   दे  म्हणत  आहेत  पण  मला  तबला   नाही  शिकायचा. या  नवीन  शाळेतली  मुले  शाळा  सुटल्यावर  Football  खेळतात  .. मला Football खेळायचा  आहे   ..जाऊदे  ..देऊन  टाकतो  next  level ..घरचे  काय  म्हणतील !!

**         वय  वर्षे  १६ 
घरचे  सगळ्याच  विषयाला  क्लास  लाव  म्हणत  आहेत  .. मला  फक्त  Eng , Maths and Science ला  क्लास  लावायचा  आहे  बाकी  सगळे  विषय  मी  घरी  करू  शकतो  पण  घरचे  नको  म्हणत  आहेत  …अख्खा  दिवस  आणि  शनिवार  रविवार  सुद्धा  माझा  क्लास  मधेच  जातोय . कधी  एकदा  हे  वर्ष  संपतंय  असे  झालंय  … पण  आत्ता  तर  फक्त  ऑगस्ट  चालूये  … नको  ते  क्लासेस  असे  सांगू  का  घरी  ? पण  नको  रिस्क  घ्यायला   .. महत्वाचे  वर्ष  आहे  .. आणि  घरचे  काय   म्हणतील  ? कमी  मार्क्स  पडले  तर  लोक  काय  म्हणतील  !!

**         वय  वर्षे  १८ 
वर्गात  एक  सुंदर  मुलगी  आहे  .. तश्या  बऱ्याच  आहेत  पण  हि  बेष्ट  आहे  .. Height excellent आहे  ..आमच्या  कॉलेजच्या  basketball   team  मध्ये  आहे  .. तिच्याशी  एकदा  बोलायचे  आहे  .. फक्त  तिला  ‘All the Best’ द्यायचे   आहे  for board exam and for basketball tournament ..बोलू  का ? पण  नको  वर्गातली  मुले  काय  म्हणतील  ? तिला  चिडवतील  का  ? मला  तिच्या  नावाने  चिडवतील  का  ? या  सगळ्याचा  अभ्यासावर  परिणाम  होईल  का  ?परीक्षा   जवळ  येतीये  .. परीक्षे नंतर  प्रत्येक जण  वेगळ्या  वाटेने  जाणार  परत  कधी  भेटेल  ते   पण  माहित  नाही  .. मला  तर  तिचे  नाव  पण  माहित  नाही . एकदा  कॉलेज  च्या  cycle stand    मध्ये  भेटावे  का  ?जाऊदे  मुल  काय  म्हणतील !!

**         वय  वर्षे  २० -  कॉलेज - 
हे   programming, coding वैताग  आहे  … मला  हे  नव्हते  करायचे  .. घरी  सांगायला  हवे  होते  कि  काहीतरी  हटके  course   करतो  १२ वी  नंतर  पण  आता  वेळ  गेलीये माझ्या  वर्गातली  मुले  मुली  काय  बिनडोक  सारखे  दिवसभर  त्या  computer मध्ये  तोंड  घालून  बसतात  .. काय  प्रोग्राम  करतात  आणि  काय  प्रिंट्स  काढतात  देव  जाणे  .. मला  त्यांना  सांगायचे  आहे  कि  अरे  मित्रांनो  side by side आपण  बऱ्याच  गोष्टी  करू  शकतो  .. बंद  करा  ते  कोडींग  चला  जरा  नाटकाला  जाऊ , काही तरी वेगळं करू  .. पण  जाऊदे  हे  लोक  काय  म्हणतील  ..आणि नाटकाचे  घरी  कळले  तर  घरचे  काय  म्हणतील !! 

**         वय  वर्षे  २२ -  कंपनी  कॅन्टीन -  
वा !!! याहून  सुंदर  मुलगी  आपण  आत्तापर्यंत  पहिली  होती  का  ?? अशक्य टीपीकल  मराठी  मुलगी  आहे  असे  कळले . जास्त  माहिती  तिच्या  प्रोजेक्ट  मध्ये  असलेल्या  आपल्या  मित्राकडून  कळू  शकते . काय  करावे  ? जाऊदे  लास्ट  Friday तर  तिला  एका  मुलाबरोबर  बाइक  वर  जाताना  पहिले . Boy Friend असणार … विचार  सोडून  दिलेला  बरा  .. आपल्याला  तिच्याशी  बोलताना  कोणी  पहिले  तर  काय  म्हणेल  ? आणि  ती  स्वतः  आपल्याला  काय  म्हणेल  ? Am I suitable?? जाऊदे  लोक  काय  म्हणतील !!

**         वय वर्षे  २६ 
Enough यार  आता  काय  हरकत  आहे  विचारायला  ?  चांगली ३ वर्ष  झाली मैत्री   आहे  आपली   ?  यार  तिला  आपण  आवडत  नसतो  तर  कशाला  इतके  वर्ष  contact ठेवला  असता  .. and seriously सगळ्या  आवडी  निवडी  match   होत  आहेत  कि  …काय  करावे  ? विचारू  का  direct ? का  आधी  घरी  विचारू  ?चल यार  विचारून  टाकू …जास्तीत  जास्त  काय  नाही  म्हणेल  ..ठीक्के  .. I have   to respect her decision … पण  नंतर  तिचे  लग्न  ठरले  कि  , यार  मी  विचारले  असते  तर  …अशा विचाराने  उगाच  रडत  तरी  बसावे  लागणार  नाही  पण  नको  ..तिने  तसा  विचारच  केला  नसेल  तर  ? आहे  ती  मैत्री  पण  संपेल  ..  common friends ला  कळले  तर  ते  पण  तोंडात  शेण  घालतील  .. सगळच  वातावरण  खराब  होईल   …जाऊदे  ती  काय  म्हणेल  आणि  महत्वाचे  म्हणजे  लोक  काय  म्हणतील !!

**         वय  वर्षे  ३२ 
खूप  अवघड  झालाय  ठरवणे .. हा  flat  घेऊ  कि  तो बायको  म्हणतीये  हा  ..  मला  वाटतंय  तोदोन्ही चांगले आहेत  पण   केवळ  २  amenities जास्त  आहेत  म्हणून  ह्या  flat   ला  ५ लाख  जास्त  !!!लूट  मार  आहे  हि  सरळ  सरळ  ..  पण  बायकोला  कोण  सांगेल जाऊदे  यार   ५ लाख  चे  लोन  जास्त  काढावे  लागणार  .. १३००  ने  EMI वाढणार  ..जाऊदे   हाच  flat   बुक  करू  .. बायको  आणि  सासरचे  परत  टोमणे  मारतील. 

**          वय  वर्षे  ४२ 
च्यायला  आठव्या  वर्षी  का  या  मुलाला   एवढी  Gadgets लागतात  ? आम्हाला  नाही  लागली  कधी  ..मान्य  आहे  कि   जमाना  बदलला  .. Tech Savvy झाली  आहेत  पोरे  पण  तरी  यार  at least २  वर्ष  तरी  समीर  ने  हि  Gadgets नाही  वापरली  पाहिजेत  ..पण  कोण  सांगणार  ..बायको  परत  एकदा  तुम्ही  80’s मधेच   आहात  अजून  असा  टोमणा  मारण्याची  संधी   सोडणार  नाही  ..जाऊदे आणुदेत  ती   Gadgets …परत  तो काय म्हणेल !!

**         वय  वर्ष  ५० 
वीटलोय   या  नोकरीला  ..अजून  किती  वर्ष !!  काय  अर्थ  आहे  या  नोकरीला  जिथे  आपण  फक्त  आला  दिवस ,  आला  तास  नुसता  ढकलतोय  .. एक  एक  तास  एक  एक  वर्षासारखा  वाटतोय  … एक  भन्नाट   आयडीया   आहे  . घरासमोरच्या   पुस्तकांच्या  दुकानात opening आहे  .. काम  काय  असणार  नुसते  counter वर  बसायचे  .. असे  कितीसे  लोक  येतात  हल्ली  मराठी  पुस्तक  घायला  !!मारू  का  Resign ? सुटेल  एकदाचा पण  नको  .. मुलीचे  लग्न व्हायचय  ..तिच्या  साठी  स्थळ  बघताना  काय  सांगणार  कि  मुलीचा  बाप  पुस्तके  विकतो  ? मुलाला  त्याच्या  social circle मध्ये  आपली  ओळख  कळून  देताना  down market वाटेल  ..आणि  हा  लाख  भर  रुपये  महिना  पगार  , एवढ्या   हजारो  सुख सोयी  आणि   दर  २  वर्षाने  मिळणारी  परदेशवारी   हि  सगळी  चैन  बायको  सोडू  देईल ? वेड्यात  काढेल. लोकांना  नाही  कळणार  कि  ८०० रुपये  महिना  पगार  असला  तरी  त्या  दुकानात  नव्या  कोऱ्या पुस्तकांना  होणारा  स्पर्श  , तो  नवीन  पुस्तकांचा  वास  मला  किती  आवडतो  …जाऊदे  … या वयात नोकरी सोडून असला वेडेपणा केला तर समाज काय म्हणेल!!

**         वय  वर्षे  ७० 
सगळं  चांगलंय  या  अमेरिकेत  .. खरच  सगळं  चांगलंय. मुलगा  सून  करोडोत  कमवतायेत, नातवा  बरोबर  रोज  खेळता  येतंय. महत्वाचे  म्हणजे  हि  खुश  आहे  इथे . पण  नाही  आता  इथे  माझे मन  रमत    .. का  ते  नाही  सांगू  शकत  .. २  वर्ष  पटकन  गेली  पण  आता  दिवस  जात  नाहीयेत  …लहानपणी  एक  स्वप्न  पहिले  होते  .. Retire   झाल्यावर  कोकणात  वाडी, स्वतः  झाडांना  पाणी  घालणार , रोज  सकाळी  समुद्राकाठी  फेर  फटका,  आज  ते  स्वप्न  का  पूर्ण  करता  येत   नाहीये  ? पैसा  तर  प्रचंड  आहे  .. मुला  कडे  पण  मागावा  लागणार  नाही  माझ्याच  पैश्यातून   वाडी  विकत  घेता  येईल .. वेळ  म्हणाल  तर  २४  तास  काहीच  काम  नाहीये  ..मग  प्रोब्लेम  काय  आहे  ?मुलगा  परत  भारतात   जाऊ  देईल  ? नुसते  भारतात  नाही  तर  कोकणात  …तो  तर  म्हणतोय  कि  मरेस्तोवर  आता  इथेच  राहा  … तसे  असेल  तर  आजच  मेलेलो  बरे  …या  काळात  सुद्धा  आई  बाबांची  काळजी  घेणारा  मुलगा  आहे  याचा  आनंद  वाटून घेऊ  का  या  वयात  सुद्धा  स्वतःच्या  मनासारखे  जगता  येत  नाहीये, एक  साधे  स्वप्न   पूर्ण  करता  येत  नाहीये  म्हणून  उर  बडवून  घेऊ  ?

**         वय  वर्षे  ७८ 
स्वतःचे  घर  , स्वतःची  माणसे  , लहानपणापसून  ओळखणारी  माणसे  …वा !!  मस्त  वाटतंय  आता  … १०  वर्षानंतर  घरी  आलो …१०  वर्ष इथे  नव्हतो  पण  महत्वाचे  म्हणजे  ६८  वर्ष  इथेच तर होतो  !!आता  सुख  ..खर  सुख  अनुभवायचे  …. शाळेत  असताना  आजोबांवर  एक  निबंध  लिहिला  होता  ..त्यात  आजोबांच्या  दिन-क्रमाचे   वर्णन  केले  होते  .. चला  आता  तसे  जगण्यावाचून  कोणी  म्हणजे  कोणी  रोखू  शकत  नाही  ….आज  हि  असती  तर  हिने  पण  रोखले  नसते  ..उलट  या  वयात  एवढा  सुखी   पाहून  आनंद  झाला  असता  तिला  . ठरले  तर  मग  ….आता  थांबणे  नाही  .. सोशल वर्क   , वाचन  , लिखाण  , TV , क्रिकेट , सिनेमा , नाटक  , कोकण  , समुद्र  , hotelling सगळं  सगळं  सगळं  करायचं  .. प्रत्येक  क्षण  न  क्षण  जगायचा  …मागची  ७८  वर्षे  केवळ  लोक  काय  म्हणतील  याचा  विचार  करत  आलो  पण  आता  नाही .

**         वय  वर्षे  ७८ 
अरे  यार  हे  काय  म्हणतायेत  कि  मी  पूर्ण  आयुष्य  जगलो  .. नाही  ओ  आत्ता  तर  कुठे  मी  खऱ्या  अर्थाने  जगायला  लागलो  होतो  . …इतक्यात  संपले ? ….इतके  दिवस  फक्त  compromise होते …. या  मला  उचलणाऱ्या  ४  लोकांना  सांगू  का  कि  अरे  थांबा ..नाही  रे  मी  नाहीच  जगलो  …जगायचे  राहूनच  गेले   …जाऊदे  आता  सांगता  येणार  नाही   आणि  सांगितले  तरी  लोक  काय  म्हणतील  !!


~ केदार

Wednesday 31 August 2011

एक अनोखी दुनिया



1 February 2011 ते आज 22 June 2011 , ५ महिन्याला थोडे दिवस कमी . गेले साडेचार महिने रोज सकाळी साधारण एक तास आणि संध्याकाळी १ तास मी एका वेगळ्या दुनियेत असतो  . एक अनोखी दुनिया. त्याचे नाव आहे bus route no 20 . चला तर मग तुम्हाला माझ्या या अनोख्या दुनियेची थोडी सफर करून आणतो . खर तर केवळ ४ महिने ज्या दुनियेत राहतोय त्यावर लगेच लिहिणे बरोबर नाही ( हे म्हणजे ४ test match खेळून "how to build a career " असे पुस्तक लिहिण्यासारखे आहे ) पण या पाच महिनांच्या बस मधल्या सफरीने माझ्या अनुभव विश्वात फार भर घातलीये त्यामुळे थोडेसे कागदावर पांढर्याचे  काळे करण्याचा प्रयत्न करतो. बघा काही जमतंय का.

या अनोख्या दुनियेत मी खूप गोष्टी शिकलोय एक गोष्ट तर मी अगदी कालच शिकलो. झाले काय कि काल मी ४ वात्रटिका लिहिल्या . बस मधल्या ४ सहकाऱ्यांवर. खरच सांगतो लिहिताना जराही विचार न करता लिहिल्या. कोण काय म्हणेल , कोण दुखावला जाईल , कोण दुरावला जाईल ? काहीही विचार न करता लिहिल्या आणि बेसावधपणे माझ्या हातून समोरच्याची दुखरी नस दाबली गेली . काही बाबतीत तर कुठली नस दुखरी आहे हे समोरचा कळवळतो  तेंव्हा  कळते त्यामुळे काहीही हेतू नसताना माझ्या हातून आगळीक घडून  गेली . लेखणीच्या कैफातूनही प्रमाद घडले असतील . त्यामुळे समोरच्यावर direct लिहिताना जरा तरी तार ताम्य बाळगायचे हे मी इथे शिकलो.

पण हे सगळे फार पुढचे झाले. या दुनियेतला माझा प्रवेश आणि त्या आधीची पार्श्वभूमी मी सांगितलीच नाही . ह्या कंपनी बस मध्ये घालवलेला वेळ फार महत्वाचा असतो असे माझे पहिल्यापासून मत आहे. सकाळी फ्रेश असताना बस मधल्या सहकाऱ्यांबरोबर ताज्या घडामोडींवर चर्चा करून दिवसाला उत्तम सुरवात करता येते आणि संध्याकाळी दिवसभराचा क्षीण घालवायला याच सहकाऱ्यांबरोबर मजा मस्ती पण करता येते . पहिल्या कंपनीच्या पहिल्या दिवसापासून माझी कंपनी बस मधला प्रवास कसा झाला पाहिजे याची हीच definition होती पण ती practically implement होताना बघायला मला तब्बल ४ वर्ष लागली (कारण Patni मधली ३ वर्षे बसमधल्या South Indian लोकांची त्यांच्या भाषेतली बडबड ऐकण्यात गेली तर  CTS मधले १ वर्ष  हिंजेवाडीच्या traffic मध्ये बस अडकल्यावर बस मध्ये झोपणाऱ्या लोकांचे  घोरणे ऐकण्यात गेले  )   शेवटी 7 February ला या अनोख्या दुनियेत पाऊल ठेवले आणि ओळखले कि ती प्रवासाची केलेली definition इथे practically बघता येणार !!

पहिल्याच दिवशी बस मध्ये एका white  बोर्ड वर upcoming birthdays लिहिले होते आणि  नवीन bike घेतलेल्या लोकांनी party द्यावी अशी एक खास पुणेरी पाटी पण होती. वाचून आनंद झाला. चला इथे आपल्याच area मधले (Pune 30 and 38 ) चे लोक आहेत . हळू हळू ओळखी होऊ लागल्या आणि एका शनिवारी सकाळी वाडेश्वर ला breakfast साठी या लोकांबरोबर गेलो . शनिवार सकाळच्या breakfast साठी सुद्धा लोक किती उत्साही असू शकतात याचा अनुभव आला आणि भारी वाटले. Feb च्या २६ तारखेला या बस मधल्या लोकांची Essel world ला trip ठरली  . मला यात काही शिरकाव करता येतोय का ते पाहिले
तर या मित्रांनी हसत हसत allow केले. ती  एक फार ज्यादा भारी trip होती आणि कधीही मला मी नवीनच या group ला join झालोय असे वाटले नाही 

त्या दिवशी घरी आल्यावर मित्राला टाकलेला तो sms अजून आठवतोय "कमाल group .. फुल हवा .. विषय cut  "
हे फुल हवा आणि विषय cut खर तर माझे शब्द आहेत पण या बस मध्ये मी असे अनेक शब्द शिकलो .
झल झल , आवरेश  हे त्यातले काही . या कंपनी चे जितके open culture आहे त्याहून जास्त open culture या बस मध्ये आहे . world cup ची इंडिया - पाक match बघायला एकत्र जमणे असो किंवा लहान लहान occasion सुद्धा बस मध्ये sweets वाटून celebrate करणे असो , एखाद्याला जरी भूक लागली तरी जोशी वडापाव / ममता  साठी  बस थांबवणे असो , एखाद्या late होणाऱ्या मित्रासाठी बस थांबवणे असो किंवा शुक्रवारी गावाला जाणाऱ्या मित्राला  Happy Journey देताना वहिनींना नमस्कार सांग असा टोमणा मारणे असो या आणि अश्या गोष्टी या बस च्या culture च्या भाग आहेत असे म्हणता येईल आणि हि संस्कृती जोपासण्यात सर्वांचाच मोठा वाट आहे . इथे एकदा Valentine day celebrate झाला होता. जराही थिल्लर पणा न करता . प्रत्येकाने बाकीच्यांबद्दल २ वाक्ये बोलायची होती . केवळ एक महिन्याची माझी ओळख असून सुद्धा ते माझ्याबद्दल चांगले बोलले होते आणि त्यांनी  एकमेकांचे करून दिलेले introduction पाहून इथे किती वेगवेगळे कला गुण अवगत असलेले लोक आहेत ते बघता आले .
नंतर त्याच लोकांच्या या गुणांचा प्रत्यय मला स्वतःला आला आणि खूप शिकायला मिळाले .

मला मराठी नाटक आणि  संगीताबद्दल खूप अक्कल आहे असा माझा समज होता . सारंगला भेटल्यावर तो लगेच दूर झाला . मला माहित नसलेल्या खूप गोष्टी त्याला माहित होत्या in fact त्याला माहित असलेले काहीच मला माहित नव्हते . अभिषेक अवंतिका मुळे भावाबहिणीचे असे नाते मी याच बस मध्ये पहिले आणि या नात्यातली अशी माया सखी बहिण मला असून मी अनुभवलेली नव्हती
मंदार ची या वयातली maturity पाहून मी त्याच्या वयाचा असताना काय करत होतो याचा फक्त विचारच करत बसलो आणि अनुप च्या कमालीच्या daring मुळे 'असले daring आपल्यात कधी येणार' हा प्रश्न मनाला चटका लाऊन गेला . management चे ओ कि ठो मला कळत नाही पण मनोज कडून management चे ४ धडे शिकलो . शिरीष कणेकरांवर मी करतो तेवढेच प्रेम करणारा  आगरकर (मित्र असल्याने अरे तुरे करू का ?) इथेच भेटला  आणि केवळ एका SMS वर सकाळी ६ ला उठून ARAI टेकडी वर माझ्या सोबत येणारा अमित पण इथेच भेटला .
camera आणि photography चे skill खूप लोकांना अवगत असते पण त्यासाठी स्वतः instrument तयार करणारे सुहास पण इथेच भेटले आणि ज्याला काही हजारांची किंमत येऊ शकते तो कॉम्पुटर अनाथ मुलांच्या आश्रमाला भेट देणारी multi - talented श्रुती अभ्यंकर पण इथेच भेटली .
तिच्या FB wall वर काहीही कारण नसताना कितीही गोंधळ घातला तरी न चिडणारी मीनाक्षी आणि या अनोख्या दुनियेची Route coordinator म्हणून इतके दिवस काम बघणारी ,
Extremely extrovert , मानसी  याच बस मध्ये भेटली

माझ्या ओळखीतला सर्वात कर्तुत्ववान माणूस म्हणून मी ज्याची ओळख करून देऊ शकतो तो आमच्या कंपनी चा Communication manager असून आमच्यात सहज वावरणारा ओंकार पण इथेच भेटला आणि पुस्तकांच्या , अक्षरांच्या दुनियेत रमणारा आणि कुठल्याही social activity साठी  केवळ एका phone वर येणारा  योगेश पण इथेच भेटला .
राहुल शेंदुरकर बद्दल मी काय बोलू !!
( शेंदुरकर शेंदुरकर
दारू सिगारेट कमी कर
अशी कविता करू का ?? :p )
याच्या बरोबर टेबल  टेनिस  खेळताना जेवढी मजा येते तेवढीच मजा नुसत्या गप्पा मारताना किंवा बस मधून बाहेरील प्रेक्षणीय स्थळे बघताना येते
यात काही नावे राहून गेली असतील तर तो माझ्या गुण-ग्राहक्तेचा दोष समजा किंवा माझी त्यांच्याशी  म्हणावी तेवढी मैत्री झालेली नाही समजा पण या अनोख्या दुनियेतला प्रत्येक जण माझ्याहून talented आहे खरा
या सहकाऱ्यांनी माझ्या आयुष्यात बहार आणली
मी त्यांच्या आयुष्यात काटे नाही पसरवले तरी खूप आहे

कुठल्याही assembly भवनाने / पार्लमेंट ने / multinational कंपनी च्या conference room ने अनुभवली नसेल एवढी चर्चा या बस ने अनुभवली आहे . कला क्रीडा सिनेमा राजकारण सर्व विषय इथे चर्चेला असतात . बालगंधर्व पासून भीमसेन पर्यंत , झाकीर पासून झहीर पर्यंत . झल झल मुलींपासून पत्ते खेळण्यापर्यंत आणि मदिरे पासून मदिराक्षी पर्यंत सर्व विषय चर्चिले जातात
आणखी एक नवीन गोष्ट म्हणजे पुस्तके . इथे बऱ्याच लोकांकडची बरीच पुस्तके वाचायला मिळतात . केवळ योगेश कडेच ४००+ पुस्तके आहेत !! थोड्या दिवसाने या बस ला चाकांवरची library म्हणतील का ??

हि एकमेव बस असेल जिथे लोक खिडकीच्या जवळची जागा नको म्हणून भांडतात !!

तर अशा या अनोख्या दुनियेत , कुठल्याही आलम दुनियेत घडतात तसे प्रकार घडले तर  नवलच पण हे नवल घडले  . इथे satta सुद्धा  खेळला गेला . World Cup नंतर IPL चालू झाले आणि आम्ही काही पोरांनी satta bazar  चालू केला . World Cup win मुळे एकत्र आलेला देश या IPL मुळे राज्य राज्यात विभागला गेला कि नाही ते माहित नाही पण आमच्या satta bazar मुळे अनोखी दुनिया थोड्या प्रमाणात विभागली गेली असे मला वाटते . आमचे सतत क्रिकेट / IPL चे discussion इतरांना bore झाले असणारच  . अर्थात हा satta केवळ कागदावरच होता तो कागदावरच राहिला पण अनोख्या दुनियेत थोडा तणाव अजून राहिला .

 गुलाबाच्या फुलांचा  गुच्छ -  
आमच्या या बस मधल्या लोकांना जर कोणी गुलाबाच्या फुलाची उपमा दिली तर मला खूप आवडेल .
गुलाबाच्या फुलांचे कसे असते कि ते एकटे फुल सुद्धा चांगलेच दिसते पण गुच्छ जास्त सुरेख दिसतो. गुलाबांनी एकत्र आल्यावर एकमेकांचे काटे टोचतायेत  म्हणून ओरडायचे नसते. काट्यानशिवाय   गुलाबाला पण मजा नाही .  तया अनोख्या दुनियेतल्या  गुलाबाच्या फुलांचा परत गुच्छ कधी बनतोय याची मी वाट बघतोय.  खर तर वाट बघायची गरज नाही . जुलै महिन्यात आम्ही भीमाशंकर ला जात आहोत तिथून येताना हा गुच्छ नक्की बनला असेल याबद्दल  माझ्यामनात तरी शंका नाही


या दुनियेत सगळे एकाच इरसाल दिंडीचे वारकरी आहेत . मी त्यांच्या पेक्षा कोणी वेगळा कोणी श्रेष्ठ हि भावनाच इथे नाही . तर  अश्या या दिंडीतल्या वारकऱ्यांना Thank You म्हणून मी आपली रजा घेतो
परत येतो पुढच्या महिन्यात भीमाशंकर trip  चे प्रवासवर्णन घेऊन .


- केदार (24.06.2011)

Monday 18 July 2011

Celebrating 50th Birthday of my Idol ...





१९९९  सालची  गोष्ट  आहे . England मध्ये  क्रिकेट  world cup चालू  होता . आमची उन्हाळाच्यी सुट्टी  चालू  होती  त्यामुळे  world cup matches ball n ball बघण्यापासून  कोणी  अडवणार  नव्हते  . क्रिकेट  फिवर  ने  देशाला  ग्रासले  होते  त्यामुळे  दिवसभर  matches बघणे  एवढा  एकच उद्योग  होता . क्रिकेट  हा  बघण्याचा  , बोलण्याचा  आणि  थोड्या  फार  प्रमाणात   खेळण्याचा  विषय  बनला  होता  पण  त्या World Cup नंतर  तो  ऐकण्याचा  विषय  पण  झाला   .

तेंव्हा  पण  matches  ला commentary   असायची  पण  ती  इंग्लिश  commentary (संपूर्ण  मराठी  medium असलेल्या  आमच्या  सारख्या क्रिकेट भक्तांना ) अजिबात  कळायची  नाही  .. त्यामुळे  TV 'mute' करून  match पाहिली  काय  किंवा  volume full करून  पाहिली   काय  फरक  पडत  नव्हता  कारण  त्या  commentators चे  इंग्लिश  कळतच  नव्हते  . उच्चार  सुद्धा   कळत  नव्हते  . पण  त्याच  दरम्यान  एक  गोड  आवाज  रोज   कानावर  पडू  लागला  . तो  गोड  आवाजात  बोलणारा  चेहरा  प्रत्येक  match   चालू  होण्याच्या  १  तास  आधी  आणि  match   संपल्यावर  एक  तास,  बाकी  experts ची  मुलाखत  घेताना, दिसू  लागला  .

त्याचे  इंग्लिश  एकदम  स्पष्ट  समजत  होते  . तो  ज्या  काही  उपमा  देत  होता  ते  मस्त  वाटत  होते  . तो  मुलाखत  घेताना  आपल्याच  मनातले  प्रश्न  विचारात  होता  . तो match मधली  कुठलीही  situation एकदम  मस्त  explain   करत  होता  . त्याच्या one liner म्हणजे  टाळीचीच   वाक्य  होती  . ह्या  माणसाने  क्रिकेट  हा  केवळ  बघण्याचा  नाही तर ऐकण्याचा  विषय  बनवून  टाकला ..
त्या ९९ च्या  World Cup नंतर  मी  हर्षा भोगले  या  माणसाच्या  प्रेमात  पडलो  .. ते  आजतागायत

इंग्लिश  भाषेवर  प्रभुत्व , खेळातले  सगळे  बारकावे  माहित  , खेळाची  history तोंड  पाठ , बोलताना  योग्य  शब्द  योग्य  जागी  वापरण्याची  हातोटी  , दिवसाच्या  पहिल्या  ball ला  जेवढा  enthusiasm  तेवढाच  शेवटच्या  ball ला , शतक  काढलेल्या  खेळाडूचे  कौतुक  करण्याची  एक  वेगळीच  पद्धत , pre match and post match show मध्ये  experts कडून  त्यांची  मत  जाणून  घेण्याची  style..
कमालीचा हजरजवाबीपणा, या  गोष्टींनी  वेड  लावले  ...

त्या  World Cup नंतर  क्रिकेट  ची  match हि  माझ्यासाठी  तरी  toss च्या  एक  तास  आधी  चालू  होऊ  लागली  आणि  हर्षा ची  commentary टर्न  आली  कि  TV चा  आवाज  आपोआप  वाढू  लागला  .. प्राण  डोळ्यातून  कानात  जाऊ  लागले …

या  माणसाची  पार्श्वभूमी  पण  रंजक  आहे . एका  फ्रेंच  शिक्षकाचा   हा  मुलगा  हैदराबाद  च्या  कॉलेज मधून  chemical engineer होतो    , IIM अहमदाबाद  मधून  पास out  होतो   आणि  नंतर  advertisement agency मधली  नौकरी  सोडून  देऊन  full time cricket commentator बनतो  ... सगळेच  तोंडात बोटे घालायला लावणारे  ..
१९  वर्षाचा  असताना  All India Radio (AIR) वर  commentator ते  आज  जगातल्या  No 1 sports channel चा  चेहरा  ... सगळाच  प्रवास  थक्क  करणारा  !!

1992 la  Australian Broadcasting Corporation  ने बोलावलेला पहिला भारतीय commentator ते  आज  400 + ODI  आणि 80 + test matches ला  आवाज  देणारा  ... सगळाच  प्रवास  थक्क  करणारा !!

कुठल्याही  खेळातल्या  नवशिक्या  खेळाडूप्रमाणे  याचा  प्रवास  सुद्धा  सुरवातीला  खडतर  होता  पण  एकदा  फॉर्म मध्ये  आल्यावर  पठ्याने  मागे  वळून  पाहिले   नाही  ... जगातल्या  No 1 sports channel वर  आपल्या  नावाचे  कार्यक्रम चालावेत  (Harsha Online, Harsha Unplugged , Harsha ki khoj) हा  किती  मोठा  बहुमान  !!

काही  कारण  आहेत  ज्यामुळे  हा  बाकी  commentators पेक्षा  वेगळा  वाटतो  .. उठून  दिसतो  ..ऐकावासा  वाटतो
हा   फार  साध्या सोप्या  भाषेत  situation   explain करतो  .. उपमा  फार  मस्त  देतो  . एक  साधे  उदाहरण   सांगतो  - एका  match मध्ये  M Hussey clear run out  होता  .. Third umpire decision pending होता  .. तो  बाद  आहे  हे  replay बघून  सगळ्यांना  कळले  होते .. अशा  वेळेस  हर्षा बोलतो    "if 2+2=4 then Hussey is out !!"

एखाद्या  फलंदाजाने  HUGE SIX मारल्यावर  "I would have given 12 runs to it!!"
Day night match ला  Gayle सारख्या  माणसाने  stadium बाहेर  च्या  बिल्डिंग  वर  चेंडू  भिरकवल्यावर  "Is anybody working there in second shift ?? we want our ball back"     अश्या  witty comments फक्त  हर्षाच  करतो  

सचिन  द्रविड  गांगुली  लक्ष्मण  हि  तर  त्याची  खास  माणसे  .. त्यांनी  शतक  केल्यावर  त्या  खेळीचे   वर्णन  करताना  हर्षा ला  ऐकले  कि  वाटते  केवळ  हर्षा  आपल्या   batting  बद्दल  काय  बोलेल  (आणि  उद्याच्या  पेपर   मध्ये  काय  लिहील ) या  उत्सुकतेपोटीच  हि  मंडळी  शतक  काढत  असावीत 

२००३  च्या  त्या  गाजलेल्या  NatWest final मध्ये  युवराज  सिंग मोक्याच्या  क्षणी  चुकीचा  फटका  मारून  out   होतो  .. परत  जाताना  त्याला  त्याच्या  चेहऱ्या वरची  निराशा  लपवता  येत  नव्हती  . अश्या  वेळेस  हर्षा  म्हणतो   "now the young man will realize that this walk back to the pavilion is the longest in the world"

अशा  काही  काही  situation असतात  कि  ज्या  फक्त  हर्षाचे  शब्दच  perfectly explain करू  शकतात  ...
किती  उदाहरण  देऊ  .. इथे  त्याच्या  सगळ्या  one liners मांडणे  अवघड  आहे  पण  आता  माझ्या  सारख्या  HB fans ची  अवस्था  अशी  आहे   कि  तुम्ही  randomly एखादी  match सांगा  .. त्या match मधल्या त्याच्या  गाजलेल्या  4-5 one liners लगेच  आठवतात  !!!

केवळ  commentary नाही  तर  खुमासदार  लिखाणातूनही  हा  माणूस  जिंकून  जातो  ..प्रत्येक  गुरवारचे  cricinfo वरचे  त्याचे  लेख  , TOI मधले  लेख  केवळ  अप्रतिम  . माईक समोरचा  हर्षा  great आणि  हातात  पेन  धरणारा  हर्षा  पण  great ... 'Out of the box ' आणि  नुकतेच  प्रसिद्ध  झालेले  Management वरचे  पुस्तक   'the winning way' .. या  पुस्तकांचा  खप  हा  हर्षा  लेखक  म्हणून  किती  मोठा  आहे  याचीच  ग्वाही  देतो 

हा  माणूस  commentary ला  असताना  नुसताच  क्रिकेट  वर  नाही  बोलत  , तो  आयुष्यावर  पण  बरेच  काही  बोलतो 

"Talent dazzles, but it has hardly anything to do with excellence. It is what you make of that talent that matters”

"Money should be bi-product of success”

"Harder you practice luckier you get"

अशा  त्याने  जाता  जाता  बोललेल्या  वाक्यांमधून  मी  तरी  खूप  काही  शिकलो  ....

साहजिकच  त्याला Idol मानायला  लागलो  होतो  आणि  त्याचा  number / mail id मिळवण्यासाठी  जीवाची  पराकाष्ठा  करत  होतो  .. मुंबई  मध्ये  असताना  त्याचा  घरचा   नंबर  मिळाला   त्यानंतर  त्याचा  घरचा  पत्ता  मिळाला  आणि  संपूर्ण   लिंक  रोड  पिंजून  काढल्यावर  सापडलेल्या  त्याच्या  त्या  बंद  घराचे  कुलूप  पण  बघायला  मिळाले  ...

पण  माझ्या  भक्तीत  काही  कमी  नव्हती  म्हणून  म्हणा  किंवा  केवळ  नशीब  होते  म्हणून  म्हणा  त्याच्या  २००९  आणि  २०१०  च्या  वाढदिवसाला  त्याच्या  घरच्या  नंबर  वर   मी  केलेला   फोन  त्यानेच  उचलला  आणि  २  मिनिट   त्याचाशी  बोलता  आले  ...पण  २  मिनटांवर  मन  भागणार  नव्हते  ... त्याला  भेटायची  इच्छा  होती  ..

एकदाचा  तो  दिवस  आला  .. २२ ऑगस्ट  २०१०  ला   बालगंधर्व  ला  "बारा  गावचे  पाणी " हा  त्याचा  विक्रम  साठे  , सुनंदन  लेले  बरोबर  talk show होता  ..एक T -shirt प्रिंट  करून  घेतला  .. ज्याच्या  पाठीवर  त्याचीच  एक  मला  सर्वात  जास्त   आवडणारी  one liner प्रिंट  करून  घेतली
"If you really want something, you will get it and there is no scientific explanation for this - Harsha Bhogle"

कार्यक्रम  संपला  ... त्याला  भेटलो  ..  पाया  पडलो  ..सही  घेतली  ..  T shirt दाखवला.. ती   ओळ  वाचून  माझ्या  पाठीवर  ठेवलेल्या  त्याच्या  हाताचा  स्पर्श  शेवटच्या  श्वासापर्यंत  तरी  मी  विसरू  शकणार  नाही   ...

 तर  असा   हा  हरहुन्नरी  हर्षा  , आज  वयाची  half  century पूर्ण  करतोय  (born on 19th July 1961) .... विश्वास  नाही  बसत  ना  ??? मला  तर  हर्षा  च्या  नावापुढे  ५०  हा  आकडा  लिहिताना  पेन  रेटत  नाहीये  ...hair transplant केलेला  हर्षा  आज   सुद्धा  इतका  तरुण  दिसतोय  कि  Goggle   लावून  , jacket  घालून  bike वर  IIM मध्ये  गेला  तर  प्रोफेसर  वाटण्यापेक्षा  विद्यार्थीच  वाटेल  !!! 

त्याला त्याच्याच भाषेत  शुभेच्छा  देतो  - "50 For Harsha ... Wonderful inning by an adorable gentleman ... it’s time to raise the bat , time to thank all your well wishers and time to take the fresh guard!! Because 50 is just a milestone.. Still a long way to go !!"

आता  माझ्या  भाषेत  शुभेच्छा देतो  - "झाले  बहु  होतील  बहु  पण  असा  commentator  होणे  नाही  !!"
हर्षा  तुला  वाढदिवसाचा  हार्दिक  शुभेच्छा   .. Thanks for everything ...


P.S.  - A moment to cherish for a long, long time.