Wednesday 7 December 2011

जगण्यासाठी फक्त कोकण हवा ...


नको तो AC नको तो Fan
मला वाडीतला गारवा हवा 

नको तो shower नको तो बाथ टब 
मोरीतल्या पाण्याचा थंडावा हवा 

नको तो बेड नको तो फोम 
खाटेवरचा मऊपणा  हवा 

नको तो burger नको ते snacks
प्यायला सोल-कढी खायला मोदकच हवा 

नको ती bislari नको  ते mineral water
खारट का असेना, पाण्याला  चवदारपणा  हवा 

नको त्या Tiles   नको ते रेड कार्पेट  
घरात गालीचा  सुद्धा  लाल  मातीचाच हवा 

नको ते Apple नको ते Orange
काटेरी असला तरी फलाहाराला फणसच हवा 

नको त्या Timelines नको त्या Deadlines
वेळ  सुद्धा  समुद्रासारखा  अमर्याद  हवा 

नको  ती  गर्दी  नको  ते  प्रदूषण 
नको ते  मुखवटे  नको  तो  भपकेपणा 


लाटांप्रमाणे एकामागे  एक  संकटे  झेलणारा,

दिवस  रात्र  दारिद्र्याशी  लढणारा, 

Mall, Multiplex, MNC चे तोंड  देखील  न  पाहिलेला,

रेतीला चटई  आणि  आभाळाला  पांघरूण  मानणारा, 

भरती ओहोटी च्या  काट्यांवर  चालणारा, 

समुद्याच्या लाटांच्या आवजालाच  Music मानणारा, 

‘अतिथी  देवो  भव:’ तत्व जगणारा, 

नैसर्गिक खजिन्याने  खिसा  भरणारा, 

आणि  सर्वात  महत्वाचे   म्हणजे , माणसातली  माणुसकी  जपणारा 

जगण्यासाठी  फक्त  कोकण  हवा  कोकण  हवा !! 


~ केदार




4 comments:

  1. Very well written kedya... Mastach.. n very true...

    ReplyDelete
  2. Khup sahi lihil ahe...Kokanatli laal maati kay mayaa lavun jate..he Kokanat nehmi janaryanna ani Kokana war prem karnaryannach kalata..Deshat ani Jagaat kuthe nahi gelo tari kahi faraq padat nahi...pan Kokanat sadaiv jaat rahnaar mi!!..karan Kokan 'Majha' ahe!

    ReplyDelete
  3. सकाळचा समुद्र, नारळी पोफळीच्या बागा, गडग्यांच्या मधून जाणारा लाल रस्ता, छोटे छोटे खळाळणारे वहाळ, त्याच्या काठांवर असलेली कोकमं किंवा रातांबीची झाडं, शांत देऊळ, देवळासमोर पाण्याचे कुंड कुंडातले छोटे छोटे मासे, शेणाने सरावलेले अंगण त्यावर झावळ्यांचे छत, छोटेसे मांजराचे पिल्लू आणि त्याची लठ्ठ आई, तांबूस गाय, वळत टाकलेल्या सुपाऱ्या, ओले काजू, करवंदाची जाळी, वळणावर असलेले जांभळाचे झाड, ओसरी पडवी, झोपाळा, भरपूर अंबरास, परसदारी हाताने फोडून खाल्लेला फणस, संध्याकाळचा समुद्र, वालाच्या बिराद्यांची उसळ, रात्रीचा झोपाळा त्याच्या भोवती बसून ऐकलेल्या भुताच्या गोष्टी, गोधडी, कंदील, शांत झोप...! ..सकाळचा समुद्र ......

    ReplyDelete
  4. Hello Kedar,

    Ekduam khara...farach sundar lihila ahes.. Mala pan Kokanat jayla far avadta.. aplepana vatto far tikde gela ki.
    Yethe alyavar parat javese vatat nahi.. ani ya goshtincha anubhav kayam ghet raha asa vatta nehmi...

    YEWA KOKAN APLACH ASA!!

    Vaibhav

    ReplyDelete