Wednesday 31 August 2011

एक अनोखी दुनिया



1 February 2011 ते आज 22 June 2011 , ५ महिन्याला थोडे दिवस कमी . गेले साडेचार महिने रोज सकाळी साधारण एक तास आणि संध्याकाळी १ तास मी एका वेगळ्या दुनियेत असतो  . एक अनोखी दुनिया. त्याचे नाव आहे bus route no 20 . चला तर मग तुम्हाला माझ्या या अनोख्या दुनियेची थोडी सफर करून आणतो . खर तर केवळ ४ महिने ज्या दुनियेत राहतोय त्यावर लगेच लिहिणे बरोबर नाही ( हे म्हणजे ४ test match खेळून "how to build a career " असे पुस्तक लिहिण्यासारखे आहे ) पण या पाच महिनांच्या बस मधल्या सफरीने माझ्या अनुभव विश्वात फार भर घातलीये त्यामुळे थोडेसे कागदावर पांढर्याचे  काळे करण्याचा प्रयत्न करतो. बघा काही जमतंय का.

या अनोख्या दुनियेत मी खूप गोष्टी शिकलोय एक गोष्ट तर मी अगदी कालच शिकलो. झाले काय कि काल मी ४ वात्रटिका लिहिल्या . बस मधल्या ४ सहकाऱ्यांवर. खरच सांगतो लिहिताना जराही विचार न करता लिहिल्या. कोण काय म्हणेल , कोण दुखावला जाईल , कोण दुरावला जाईल ? काहीही विचार न करता लिहिल्या आणि बेसावधपणे माझ्या हातून समोरच्याची दुखरी नस दाबली गेली . काही बाबतीत तर कुठली नस दुखरी आहे हे समोरचा कळवळतो  तेंव्हा  कळते त्यामुळे काहीही हेतू नसताना माझ्या हातून आगळीक घडून  गेली . लेखणीच्या कैफातूनही प्रमाद घडले असतील . त्यामुळे समोरच्यावर direct लिहिताना जरा तरी तार ताम्य बाळगायचे हे मी इथे शिकलो.

पण हे सगळे फार पुढचे झाले. या दुनियेतला माझा प्रवेश आणि त्या आधीची पार्श्वभूमी मी सांगितलीच नाही . ह्या कंपनी बस मध्ये घालवलेला वेळ फार महत्वाचा असतो असे माझे पहिल्यापासून मत आहे. सकाळी फ्रेश असताना बस मधल्या सहकाऱ्यांबरोबर ताज्या घडामोडींवर चर्चा करून दिवसाला उत्तम सुरवात करता येते आणि संध्याकाळी दिवसभराचा क्षीण घालवायला याच सहकाऱ्यांबरोबर मजा मस्ती पण करता येते . पहिल्या कंपनीच्या पहिल्या दिवसापासून माझी कंपनी बस मधला प्रवास कसा झाला पाहिजे याची हीच definition होती पण ती practically implement होताना बघायला मला तब्बल ४ वर्ष लागली (कारण Patni मधली ३ वर्षे बसमधल्या South Indian लोकांची त्यांच्या भाषेतली बडबड ऐकण्यात गेली तर  CTS मधले १ वर्ष  हिंजेवाडीच्या traffic मध्ये बस अडकल्यावर बस मध्ये झोपणाऱ्या लोकांचे  घोरणे ऐकण्यात गेले  )   शेवटी 7 February ला या अनोख्या दुनियेत पाऊल ठेवले आणि ओळखले कि ती प्रवासाची केलेली definition इथे practically बघता येणार !!

पहिल्याच दिवशी बस मध्ये एका white  बोर्ड वर upcoming birthdays लिहिले होते आणि  नवीन bike घेतलेल्या लोकांनी party द्यावी अशी एक खास पुणेरी पाटी पण होती. वाचून आनंद झाला. चला इथे आपल्याच area मधले (Pune 30 and 38 ) चे लोक आहेत . हळू हळू ओळखी होऊ लागल्या आणि एका शनिवारी सकाळी वाडेश्वर ला breakfast साठी या लोकांबरोबर गेलो . शनिवार सकाळच्या breakfast साठी सुद्धा लोक किती उत्साही असू शकतात याचा अनुभव आला आणि भारी वाटले. Feb च्या २६ तारखेला या बस मधल्या लोकांची Essel world ला trip ठरली  . मला यात काही शिरकाव करता येतोय का ते पाहिले
तर या मित्रांनी हसत हसत allow केले. ती  एक फार ज्यादा भारी trip होती आणि कधीही मला मी नवीनच या group ला join झालोय असे वाटले नाही 

त्या दिवशी घरी आल्यावर मित्राला टाकलेला तो sms अजून आठवतोय "कमाल group .. फुल हवा .. विषय cut  "
हे फुल हवा आणि विषय cut खर तर माझे शब्द आहेत पण या बस मध्ये मी असे अनेक शब्द शिकलो .
झल झल , आवरेश  हे त्यातले काही . या कंपनी चे जितके open culture आहे त्याहून जास्त open culture या बस मध्ये आहे . world cup ची इंडिया - पाक match बघायला एकत्र जमणे असो किंवा लहान लहान occasion सुद्धा बस मध्ये sweets वाटून celebrate करणे असो , एखाद्याला जरी भूक लागली तरी जोशी वडापाव / ममता  साठी  बस थांबवणे असो , एखाद्या late होणाऱ्या मित्रासाठी बस थांबवणे असो किंवा शुक्रवारी गावाला जाणाऱ्या मित्राला  Happy Journey देताना वहिनींना नमस्कार सांग असा टोमणा मारणे असो या आणि अश्या गोष्टी या बस च्या culture च्या भाग आहेत असे म्हणता येईल आणि हि संस्कृती जोपासण्यात सर्वांचाच मोठा वाट आहे . इथे एकदा Valentine day celebrate झाला होता. जराही थिल्लर पणा न करता . प्रत्येकाने बाकीच्यांबद्दल २ वाक्ये बोलायची होती . केवळ एक महिन्याची माझी ओळख असून सुद्धा ते माझ्याबद्दल चांगले बोलले होते आणि त्यांनी  एकमेकांचे करून दिलेले introduction पाहून इथे किती वेगवेगळे कला गुण अवगत असलेले लोक आहेत ते बघता आले .
नंतर त्याच लोकांच्या या गुणांचा प्रत्यय मला स्वतःला आला आणि खूप शिकायला मिळाले .

मला मराठी नाटक आणि  संगीताबद्दल खूप अक्कल आहे असा माझा समज होता . सारंगला भेटल्यावर तो लगेच दूर झाला . मला माहित नसलेल्या खूप गोष्टी त्याला माहित होत्या in fact त्याला माहित असलेले काहीच मला माहित नव्हते . अभिषेक अवंतिका मुळे भावाबहिणीचे असे नाते मी याच बस मध्ये पहिले आणि या नात्यातली अशी माया सखी बहिण मला असून मी अनुभवलेली नव्हती
मंदार ची या वयातली maturity पाहून मी त्याच्या वयाचा असताना काय करत होतो याचा फक्त विचारच करत बसलो आणि अनुप च्या कमालीच्या daring मुळे 'असले daring आपल्यात कधी येणार' हा प्रश्न मनाला चटका लाऊन गेला . management चे ओ कि ठो मला कळत नाही पण मनोज कडून management चे ४ धडे शिकलो . शिरीष कणेकरांवर मी करतो तेवढेच प्रेम करणारा  आगरकर (मित्र असल्याने अरे तुरे करू का ?) इथेच भेटला  आणि केवळ एका SMS वर सकाळी ६ ला उठून ARAI टेकडी वर माझ्या सोबत येणारा अमित पण इथेच भेटला .
camera आणि photography चे skill खूप लोकांना अवगत असते पण त्यासाठी स्वतः instrument तयार करणारे सुहास पण इथेच भेटले आणि ज्याला काही हजारांची किंमत येऊ शकते तो कॉम्पुटर अनाथ मुलांच्या आश्रमाला भेट देणारी multi - talented श्रुती अभ्यंकर पण इथेच भेटली .
तिच्या FB wall वर काहीही कारण नसताना कितीही गोंधळ घातला तरी न चिडणारी मीनाक्षी आणि या अनोख्या दुनियेची Route coordinator म्हणून इतके दिवस काम बघणारी ,
Extremely extrovert , मानसी  याच बस मध्ये भेटली

माझ्या ओळखीतला सर्वात कर्तुत्ववान माणूस म्हणून मी ज्याची ओळख करून देऊ शकतो तो आमच्या कंपनी चा Communication manager असून आमच्यात सहज वावरणारा ओंकार पण इथेच भेटला आणि पुस्तकांच्या , अक्षरांच्या दुनियेत रमणारा आणि कुठल्याही social activity साठी  केवळ एका phone वर येणारा  योगेश पण इथेच भेटला .
राहुल शेंदुरकर बद्दल मी काय बोलू !!
( शेंदुरकर शेंदुरकर
दारू सिगारेट कमी कर
अशी कविता करू का ?? :p )
याच्या बरोबर टेबल  टेनिस  खेळताना जेवढी मजा येते तेवढीच मजा नुसत्या गप्पा मारताना किंवा बस मधून बाहेरील प्रेक्षणीय स्थळे बघताना येते
यात काही नावे राहून गेली असतील तर तो माझ्या गुण-ग्राहक्तेचा दोष समजा किंवा माझी त्यांच्याशी  म्हणावी तेवढी मैत्री झालेली नाही समजा पण या अनोख्या दुनियेतला प्रत्येक जण माझ्याहून talented आहे खरा
या सहकाऱ्यांनी माझ्या आयुष्यात बहार आणली
मी त्यांच्या आयुष्यात काटे नाही पसरवले तरी खूप आहे

कुठल्याही assembly भवनाने / पार्लमेंट ने / multinational कंपनी च्या conference room ने अनुभवली नसेल एवढी चर्चा या बस ने अनुभवली आहे . कला क्रीडा सिनेमा राजकारण सर्व विषय इथे चर्चेला असतात . बालगंधर्व पासून भीमसेन पर्यंत , झाकीर पासून झहीर पर्यंत . झल झल मुलींपासून पत्ते खेळण्यापर्यंत आणि मदिरे पासून मदिराक्षी पर्यंत सर्व विषय चर्चिले जातात
आणखी एक नवीन गोष्ट म्हणजे पुस्तके . इथे बऱ्याच लोकांकडची बरीच पुस्तके वाचायला मिळतात . केवळ योगेश कडेच ४००+ पुस्तके आहेत !! थोड्या दिवसाने या बस ला चाकांवरची library म्हणतील का ??

हि एकमेव बस असेल जिथे लोक खिडकीच्या जवळची जागा नको म्हणून भांडतात !!

तर अशा या अनोख्या दुनियेत , कुठल्याही आलम दुनियेत घडतात तसे प्रकार घडले तर  नवलच पण हे नवल घडले  . इथे satta सुद्धा  खेळला गेला . World Cup नंतर IPL चालू झाले आणि आम्ही काही पोरांनी satta bazar  चालू केला . World Cup win मुळे एकत्र आलेला देश या IPL मुळे राज्य राज्यात विभागला गेला कि नाही ते माहित नाही पण आमच्या satta bazar मुळे अनोखी दुनिया थोड्या प्रमाणात विभागली गेली असे मला वाटते . आमचे सतत क्रिकेट / IPL चे discussion इतरांना bore झाले असणारच  . अर्थात हा satta केवळ कागदावरच होता तो कागदावरच राहिला पण अनोख्या दुनियेत थोडा तणाव अजून राहिला .

 गुलाबाच्या फुलांचा  गुच्छ -  
आमच्या या बस मधल्या लोकांना जर कोणी गुलाबाच्या फुलाची उपमा दिली तर मला खूप आवडेल .
गुलाबाच्या फुलांचे कसे असते कि ते एकटे फुल सुद्धा चांगलेच दिसते पण गुच्छ जास्त सुरेख दिसतो. गुलाबांनी एकत्र आल्यावर एकमेकांचे काटे टोचतायेत  म्हणून ओरडायचे नसते. काट्यानशिवाय   गुलाबाला पण मजा नाही .  तया अनोख्या दुनियेतल्या  गुलाबाच्या फुलांचा परत गुच्छ कधी बनतोय याची मी वाट बघतोय.  खर तर वाट बघायची गरज नाही . जुलै महिन्यात आम्ही भीमाशंकर ला जात आहोत तिथून येताना हा गुच्छ नक्की बनला असेल याबद्दल  माझ्यामनात तरी शंका नाही


या दुनियेत सगळे एकाच इरसाल दिंडीचे वारकरी आहेत . मी त्यांच्या पेक्षा कोणी वेगळा कोणी श्रेष्ठ हि भावनाच इथे नाही . तर  अश्या या दिंडीतल्या वारकऱ्यांना Thank You म्हणून मी आपली रजा घेतो
परत येतो पुढच्या महिन्यात भीमाशंकर trip  चे प्रवासवर्णन घेऊन .


- केदार (24.06.2011)

1 comment: